चित्रपटसृष्टीतील स्टारकिड्स अनेकवेळा चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांच्या ब्रॅण्डेड गोष्टींपासून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबत अनेक चर्चा रंगत असतात. अशातच आणखी एका स्टारकिडचे नाव सध्या चर्चेत आले आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट आपल्या नावावर असलेला अभिनेता चंकी पाडे यांच्या पुतण्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. चंकीचा पुतण्या अहान हा धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र चंकी पांडेने यावर पडदा टाकला आहे. बॉलिवूडमध्ये अहान धर्मा प्रोडक्शनअंतर्गंत पदार्पण करणार नसून चंकीची मुलगी अनन्या करणच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पदार्पण करणार आहे.
वाचा : कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डूडल !
धर्मा प्रॉडक्शन अंतर्गंत तयार होणा-या ‘स्टुटंड ऑफ दि इयर २’ या चित्रपटामध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्याची वर्णी लागली आहे. अहानची इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बरीच फॅन फॉलोविंग आहे. मात्र सध्या तरी तो धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार नसून एका वेगळ्याच निर्मिती संस्थेतून चंदेरी दुनियेमध्ये येणार आहे.
अहान मला मुलाप्रमाणे आहे. तो प्रचंड मेहनती असून त्याच्यापदार्पणाबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. कदाचित तो यशराज प्रॉडक्शन अंतर्गंत सुद्धा पदार्पण करु शकतो. मात्र सध्या याविषयी काहीच स्पष्ट करता येणार नाही, असे चंकीने सांगितले. त्यामुळे आहान नक्की कधी आणि कोणत्या प्रॉडक्शनमधून बॉलिवूडमध्ये येणार याविषयी उत्सुकता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 12:54 pm