News Flash

‘रॉ स्टार’चे चित्रीकरण चार तास खोळंबले

आज ब्लू है पानी पानी, पार्टी विथ द भूतनाथ इ. गाण्यांबरोबरच अल्बममुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक यो यो हनी सिंग स्क्रीनवर गुलछबू वाटत असला

| August 29, 2014 01:01 am

आज ब्लू है पानी पानी, पार्टी विथ द भूतनाथ इ. गाण्यांबरोबरच अल्बममुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक यो यो हनी सिंग स्क्रीनवर गुलछबू वाटत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एका अल्बमच्या प्रकाशनावेळी काहीसा भांबावलेल्या हनीने चक्क सेटवर आपली पत्नी, शालिनीला बोलावून घेतले. तिला यायला वेळ लागल्याने रॉ स्टार या कार्यक्रमाचे चित्रीकरण चक्क तास खोळंबले होते.
रॉ स्टार शोमध्ये हनी सिंग त्याच्या नवीन अल्बमचे प्रकाशन करणार होता. त्यानिमित्ताने सर्व तयारीही झाली होती. पण ऐनवेळेस तो ‘नव्‍‌र्हस’ झाला आणि त्याने त्याच्या बायकोला सेटवर येण्यास सांगितले आणि ती येईपर्यंत म्हणजे तब्बल चार तास या शोचे चित्रीकरण खोळंबले होते. हनीने यापूर्वी कधीही त्याची पत्नीला प्रसारमाध्यमांसमोर आणले नव्हते. त्यामुळे यानिमित्ताने पहिल्यांदाच हनीने तिची आपल्या चाहत्यांशी ओळख करून दिली. यावेळेस बोलताना त्याने माझी बायको माझी सर्वात चांगली मैत्रीण असून, मी दरवेळी तिचे सल्ले आणि सूचना ऐकतो अशी प्रामाणिक कबुली दिली तसेच या प्रसंगी तिने माझ्यासोबत असणे फार महत्त्वाचे होते, त्यामुळे मी तिला बोलावून घेतल्याचेही हनीने स्पष्ट केले. चित्रिकरण खोळंबल्यामुळे दिलगिरी व्यक्त करत हनीने सर्वाची माफी मागितली आणि यापुढे आपण आपल्या शोकडे जास्त गंभीरतेने पाहू असे सांगत, यानंतर आपल्यामुळे कधीही शोचे चित्रिकरण लांबणार नाही असेही आश्वासन दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:01 am

Web Title: nervous honey singh delays shoot of raw star
Next Stories
1 गणेशोत्सव विशेष : दिवस सरले, उरल्या आठवणी! – वीणा जामकर
2 बहिणीचा हट्ट, पण पोशाख घट्ट
3 फेसबुकने पूनम पांडेचे अकाऊंट केले ‘डिअॅक्टिव्ह’!
Just Now!
X