News Flash

नेटफ्लिक्सची मेजवानी, या वर्षात घेऊन येणार 41हूनही अधिक नवे चित्रपट आणि शोज

जाणून घ्या काय आहे नेटफ्लिक्सचं नेटकऱ्यांसाठीचं गिफ्ट....

नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची आणि वेबसीरीजची नावं नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. वेगवेगळया भाषेतल्या वेगवेगळ्या विषयांवरचे 41 पेक्षाही जास्त चित्रपट, आणि वेबसीरीज नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार आहे. यात काही आधीच्या गाजलेल्या वेबसीरीजचा आणि चित्रपटांच्या सिक्वेल्सचाही समावेश आहे.

‘दिल्ली क्राईम सीझन २’, ‘जमतारा २’, ‘कोटा फॅक्टरी २’, ‘मिसमॅचड् सीझन २’, ‘लिटल थिंग्ज सीझन ३’ आणि बरेच चित्रपट आणि वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहेत. जगभरातले अनेक चित्रपट महोत्सव गाजवलेला ‘बॉम्बे रोज’ हा चित्रपटही येत्या महिला दिनी म्हणजे 8 मार्चला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच कपिल शर्माचा बहुप्रतिक्षीत वेब शो आणि सान्या मल्होत्राचा विनोदी चित्रपट ‘पगलैट’ही लवकरच नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

माधुरी दिक्षीतची प्रमुख भूमिका असलेला ‘फाईंडिंग अनामिका’, आर माधवन आणि सुवरीन चावलाचा ‘डिकपल्ड’ आणि अमोल पराशरचा ‘फिल्स लाईक इश्क’ या शोजची नेटफ्लिक्सने घोषणा केली आहे. अरण्यकच्या माध्यमातून रविना टंडन वेबविश्वात पदार्पण करत आहे. कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला ‘धमाका’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि त्यातून कार्तिक आर्यनचा नवा लूकही पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

दंगल गर्ल सान्या मल्होत्राचा ‘पगलैट’ हा चित्रपट येत्या 12 मार्चला प्रदर्शित होत आहे तर तिचाच ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपटही लवकरच नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग हे दोघे एकत्र दिसणार आहेत ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटातून. तर ‘मसाबा मसाबा’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘मसाबा मसाबा २’ हाही चित्रपट प्रेक्षकांना या वर्षात पाहायला मिळणार आहे. तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपटही या वर्षात नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. तेव्हा आपली वेळ राखून ठेवा या मेजवानीचा पोटभर आस्वाद घ्यायला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanya Malhotra(@sanyamalhotra_)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:38 pm

Web Title: netfilx is releasing more than 41 movies and show this year vsk 98
Next Stories
1 कॉमेडी इतकंच रोमँटिक भूमिका साकारताना देखील दडपण असतं – सागर कारंडे
2 सनीच्या फोटो शूटमधील व्हिडीओ व्हायरल
3 ट्विटरवर ‘अजय देवगण कायर है’ ट्रेंड, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X