‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ च्या यशानंतर आता लवकरच माहेश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांच्यावर आधारित सिरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २; या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. एकट्या ‘बाहुबली २’ नं भारतात जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाचा आणखी एक प्रिक्वल वेबसरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यातून उलगडत जाणार आहे.

एकूण ९ भागांची ही वेबसिरिज असणार आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्यूजन’ या दोन्ही चित्रपटातून अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळल्या मात्र आता यातून माहेश्मती साम्राज्याच्या सम्राज्ञीची कधीही न ऐकलेली कहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.