News Flash

प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार Money Heist चा पाचवा सीझन

पाचव्या सीझनचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या कथेच्या जोरावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या सीरिजचा पाचवा भाग कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. आता ‘मनी हाईस्ट ५’च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट ५’ या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. या सीरिजचा पाचवा सीझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच सीरिजचा टीझर चर्चेत आहे. यापूर्वी मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्तेने सीरिज पाच मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. पण काही कारणास्तव प्रदर्शिनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

Video: ‘हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो’, अभयने सांगितला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा किस्सा

‘मनी हाईस्ट’ ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमधील आहे. भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याच्याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे. या सीरिजचा चौथा सीझन गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये पाचव्या सीझन बाबत उत्सुकता होती. आता अखेर ‘मनी हाईस्ट’ सीरिजचा पाचवा सीझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 10:41 am

Web Title: netflix announces release dates of money heist 5 avb 95
Next Stories
1 ‘अशा’ अवतारात कुणाल खेमू पहिल्यांदा सोहा अली खानच्या आईला भेटला
2 आदित्य नारायणने अलिबागकरांची मागितली माफी; म्हणाला “अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम”
3 ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर; तिच्या सांगण्यावरून टेकडीवरून मारली होती उडी
Just Now!
X