News Flash

२२ वर्षांच्या रिअॅलिटी स्टारचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वी दिले होते संकेत

तिने नेटफ्लिक्सवरील टेरेस हाउस या शोमध्ये सहभाग घेतला होता.

जपानी प्रो-रेसलर आणि नेटफ्लिक्सचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘टेरेस हाउस’मधील स्टार हाना किमूराचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या राहत्या घरात तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ऑर्गनायजेशन स्टारडम रेसल‍िंगने शनिवारी हानाच्या निधनाचे वृत्त दिले आहे. इतक्या कमी वयात हानाचा मृत्यू झाल्यामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण हानाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हाना नेटफ्लिक्सवरील टेरेस हाउस या शोमध्ये सहभागी होताच सोशल मीडियावर चर्चेत होती. तिला अनेकांनी ट्रोल देखील केले होते. हा शो टोकियोमधील एका घरात राहणाऱ्या तीन महिला आणि तीन पुरुषांवर आधारित होता. करोना व्हायरसमुळे शो सध्या थांबवण्यात आला होता.

हानाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने मांजरीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यासोबतच गूडबाय असा मेसेज लिहिला होता. त्याचबरोबर तिने चाहत्यांना आनंदी राहण्याचा मेसेज दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 3:23 pm

Web Title: netflix reality show terrace house japanese tv star hana kimura found dead at home avb 95
Next Stories
1 हॉलिवूडच्या रॅपरला टॅटूचं वेड; एक टॅटू काढायला लागले चक्क ६० तास
2 सलमान विकणार ‘फ्रेश’ सॅनिटायझर; फॉर्म हाऊसवरुनच केली नव्या ब्रॅण्डची घोषणा
3 “माझा फोटो कुख्यात गुंडासोबत दाखवला कसा?”; ‘पाताल लोक’ पाहून भाजपा आमदार संतापला
Just Now!
X