News Flash

नेटफ्लिक्सच्या चार नव्या ‘दास्तान्स’; करन जोहरने शेअर केला ट्रेलर

फातिमा सना शेख, कोंकणा सेन, शेफाली शाह, नुसरत भरुचा प्रमुख भूमिकेत

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ५ स्त्रीयांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ह्या शॉर्ट स्टोरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करन जोहरने ट्विट करत हा ट्रेलर शेअर केला आहे.

अजिब दास्तान्स हा नेटफ्लिक्सचा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात कोंकणा सेन शर्मा, नुसरत भरूचा, फातिमा सना शेख, शेफाली शाह, आदिती राव हैदरी, जयदीप अहलावत, मानव कौल हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या ट्रेलरमधून हे दिसून येत आहे की, यात चार वेगळ्या कथा सांगितल्या आहेत. या कथा मुख्य पात्रांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या आहेत. यातलं एक पात्र म्हणजे मंजूची कथा दिग्दर्शित केली आहे शशांक खैतान यांनी! यात फातिमा सना शेख आणि जयदीप अहलावत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नवीन लग्न झालेल्या या जोडप्याच्या आयुष्याची सुरुवात काहीशी कटू पद्धतीने होते. नुसरत भरुचाची प्रमुख भूमिका असलेली कथा दिग्दर्शित केली आहे राज मेहता यांनी. आपल्या मुलीच्या भल्यासाठी आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागणारी आई तिने रंगवली आहे. शेफाली शाह आणि मानव कौल या दोघांनी एक प्रेमकहाणी रंगवली आहे. मात्र ही प्रेमकहाणी मूक आहे. मानव कौल याने मूक पात्र साकारलं आहे. यातली वेगळी उठून दिसणारी कहाणी पडद्यावर आणली आहे नीरज घायवान यांनी. आदिती राव हैदरी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी एकमेकांवर प्रेम करणारी मात्र कबूल करण्यास कचरणारी स्त्री पात्रं साकारली आहेत.

करन जोहरने यांची ही निर्मिती असून शशांक खैतान, राज मेहता, नीरज घायवान, कयोझ इरानी या चौघांनी ह्या कथा दिग्दर्शित केल्या आहेत.  १६ एप्रिलला ह्या कथा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 2:45 pm

Web Title: netflix releases trailer of its new film ajeeb dastans vsk 98
Next Stories
1 “गरूडाचे रूप घेतलेस का?”, अनोख्या फोटोशूटमुळे सोनम कपूर झाली ट्रोल
2 त्या गोष्टींमुळेच आमच्यामध्ये वाद झाले; गोविंदासोबतच्या वादावर कृष्णाचे वक्तव्य
3 २०२१मध्ये अजय मालामाल? या वर्षात बिग बजेट चित्रपटांचा पाऊस!
Just Now!
X