News Flash

‘हाच खरा कबीर खान’; महिला हॉकी संघाच्या विजयानंतर संघ प्रशिक्षकावर कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर कबीर खान हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

sjored marijine, shahrukh khan,
सोशल मीडियावर कबीर खान हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने नमवून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिलांनी केलेल्या या कामगिरीनंतर सोशल नेटवर्किंगवरही त्यांची स्तुती केली जात आहे. तर यावर सोशल मीडियावर अनेक हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. त्या पैकी एक म्हणजे कबीर खान आहे.

भारतीय महिला संघाने हा विजय मिळवल्यानंतर भारतासाठी हा ‘चक दे इंडिया’ चित्रपटासारखाच क्षण होता. कबीर खान आणि ‘चक दे इंडिया’ ट्वीटरवर ट्रेंड होत आहेत. खेळाडूंच्या या उत्तम कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी त्यांचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांचे कौतुक करत ट्वीट केले आहे.

एक नेटकरी म्हणाला, ‘दोन व्यक्ती ज्यांनी भारतीय महिला हॉकी टीममध्ये एक बदल आणला एक रील कबीर खान आणि खऱ्या आयुष्यातील शोर्ड मरिन.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रिओ २०१६ मध्ये एकही सामना न जिंकलेल्या संघाला टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये उपांत्यफेरीत पोहोचवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सारख्या टीमला पराभूत करण्यासाठी, शोर्ड मरिन यांचे कौतुक केले पाहिजे, त्यांना पुरस्कार मिळालाच पाहिजे. खऱ्या आयुष्यातला कबीर खान.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भारतीय महिला हॉकी टीमच्या विजयासाठी प्रशिक्षक शोर्ड मरिन यांचे आभार!! खरा कबीर खान. शोर्ड मरिन हा भारतीय महिला हॉकीचा खरा शाहरुख खान आहे,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

बॉलिवूड चित्रपट ‘चक दे इंडिया’ मध्ये शाहरुख खानचे पात्र ‘कबीर खान’ भारतीय महिला हॉकी संघाला जागतिक जेतेपदासाठी प्रशिक्षण देताना दिसतो. हा चित्रपट आज ही लोकांच्या लक्षात आहे. तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक तरुणांनी हॉकीमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2021 3:13 pm

Web Title: netizens compare indian women s hockey coach sjoerd marijne to shah rukh khan character kabir khan from chak de india dcp 98
Next Stories
1 प्रार्थना बेहरे ‘या’ मालिकेतून करणार मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण
2 अभिनेत्री जिया खानच्या मृत्यु प्रकरण : सूरज पंचोली म्हणाला, “आता तरी निकाल लावा”
3 अनुष्काच्या लंडनमधील त्या फोटोवर विराटची कमेंट, मजेशीर उत्तर देत अनुष्का म्हणाली…
Just Now!
X