News Flash

“कधी येणार ‘मिसमॅच्ड’चा दुसरा सिझन?”, अभिनेता रोहित सराफच्या फोटोमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली

प्राजक्ता आणि रोहितची शोमधील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे या शोचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहचे आतुरतेने वाट पाहत आहेत.

(Photo- Rohit Saraf instagram)

‘मिसमॅच्ड’ हा २०२० सालामध्ये आलेला नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब शो पैकी एक आहे. ही एक रोम-कॉम वेब सीरीज असून यात लोकप्रिय युट्यूबर  प्राजक्ता कोळीने डिम्पल अहुजाची तर अभिनेता रोहित सराफने ऋषी शेखावतची प्रमुख भूमिका साकारली होती.  प्राजक्ता आणि रोहितची ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडली आहे. त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने लाखो प्रेक्षकांची खास करून तरुणांची मनं जिंकली. त्यामुळे या शोचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहचे आतुरतेने वाट पाहत आहेत.

रोहित आणि प्राजक्ता सोशल मीडीयावर चांगलेच सक्रिय आहेत. ते सतत आपल्या चाहत्यांशी संर्पकात राहतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात. रोहितने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्याचे चाहते चांगलेच कोड्यात पडले आहेत. रोहितने इंनस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत प्राजक्ता आणि रोहित दोघेही शोचे दिग्दर्शक अकर्श खुराना सोबत पोझ देताना दिसतं आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहित आणि प्राजक्ता ‘मिसमॅच्ड’च्या सहकलाकारांबरोबर एक सेल्फी कढताना दिसत आहेत.  रोहितने क्यूट इमोजी सह ही पोस्ट इंनस्टाग्रामवर शेअर केली. ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)

रोहितच्या पोस्टवर एका युजरने तर प्रश्न विचारला,  “दुसरा सिझन कधी येणार?”  ‘ तर आणखीन एक युजर म्हणाला,  “.येस मला विश्वासच बसत नाहीय की दुसरा सिझन येतोय” तर दुसरीकडे शोच्या  प्रोडक्शन हाउसने (आरएसव्हिपी मुव्हीज )ने केलेल्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. “आपल्याला रीयूनियन हवं आहे” अशी कमेंट त्यांनी केलीय .तर या पोस्टवर प्राजक्ता म्हणाली, “याच्या पेक्षा छान कॅप्शन असूच शकत नाही” . रोहितने शेअर केलेल्या पोस्टवरून काही चाहते असा ही तर्क लावत आहेत की कदाचीत ही भेट दुसऱ्या सिझनसाठी असू शकेल.

हे देखील वाचा: चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक

Rohit-saraf-instagram-page photo- Rohit Saraf instagram

‘मिसमॅच्ड’  हा नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो असून यूट्यूबर मोस्टलीसेन म्हणजेच प्राजक्ता कोळीची ही डेब्यु वेब सीरीज आहे. या वेब सीरिजचा दुसरा सिझन वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यात प्राजकता ,रोहीत बरोबरच कृतिका भारद्वाज, मुस्कान जाफरी , विद्या मालवडे, तारूक रैना, निधी सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 7:41 pm

Web Title: netizens demand to producer for mismatched season 2 as the love to watch parakta koli and rohit saraf chemistry kpw 89 aad 97
Next Stories
1 श्वेता तिवारीने शेअर केला मुलगी पलक तिवारीचा BTS व्हिडीओ, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल
2 LGBT Pride Month Special: समलैंगिक संबंधांवर प्रकाश टाकणारे हे मराठी सिनेमा आणि शो पाहिले का?
3 एका ट्रकला पाहून जावेद अख्तर यांनी लिहिलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं…
Just Now!
X