16 January 2021

News Flash

“समंथा कुठे आहे?”; संतापलेले नेटकरी ‘सेक्स अँड द सीटी’चा ट्रेलर करतायेत ट्रोल

२० वर्षानंतर येतोय लोकप्रिय मालिकेचा सीक्वल; ट्रेलर पाहूनच संतापले नेटकरी

‘सेक्स अँड द सीटी’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जीते. डार्क कॉमेडी आणि रोमान्सने भरलेली ही मालिका ९०च्या दशकात सुपरहिट ठरली होती. आनंदाची बाब म्हणजे तब्बल २० वर्षानंतर या मालिकेचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच एचबीओ मॅक्सने ‘सेक्स अँड द सीटी भाग – २’ ची घोषणा केली. यावेळी ही मालिका एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SJP (@sarahjessicaparker)

अलिकडेच या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत जगभरातील लाखो चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला. परंतु हा ट्रेलर पाहून काही चाहत्यांची निराशा देखील झाली आहे. या ट्रेलरमध्ये समंथा कुठे आहे? असा सवाल करत नाराज नेटकऱ्यांनी सीरिजच्या ट्रेलरला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सेक्स अँड द सीटी ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. सारा पारकर, किम कार्टेल, ख्रिस्टन डेविस आणि सिंथिया निक्सॉन या चौघींनी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. जबरदस्त विनोद आणि अफलातून अभिनय यामुळे मी मालिका त्यावेळी सुपरहिट ठरली होती. ही मालिका प्रसिद्ध लेखिका कँडिस बुशनेल यांच्या सेक्स अँड द सीटी नामक एका कादंबरीवर आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 4:53 pm

Web Title: netizens react as sex and the city announces revival mppg 94
Next Stories
1 ‘द फॅमिली मॅन २’चा टीझर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘तिचा भूतकाळच तिचे भविष्य वाचवू शकतो’, परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित
3 बिकिनी न घातल्यामुळे करिअला लागली उतरती कळा; अभिनेत्रीनं सांगितली आपबिती
Just Now!
X