News Flash

कोरिओग्राफर टेरेन्सने नोरा फतेहीसोबत केले गैरवर्तन?

सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेत आहे

अभिनेत्री मलायका अरोराला करोनाचा संसर्ग होताच ती परिक्षक म्हणून काम करत असलेल्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीची एण्ट्री झाली. नोरा शोमध्ये परिक्षक कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईससोबत मजा मस्ती करताना दिसत होती. पण सध्या एका वेगळ्या कारणासाठी नोरा चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर इंडियाज बेस्ट डान्सर शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टेरेन्स नोरासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा व्हिडीओ चुकीच्या कॅमेरा अँगलने शूट तर नाही ना झाला असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. पण व्हिडीओ पाहून चाहत्यांनी टेरेन्सला सुनावले आहे.

एका यूजरने ‘टेरेन्सकडून हे अपेक्षित नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा टेरेन्स आहे?’ असे म्हटले आहे. पण अद्याप टेरेन्स किंवा नोराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराला करोनाची लागण झाली. त्यामुळे ती परिक्षक म्हणून काम करत असलेल्या इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये नोरा फतेहीला घेण्यात आले. नोराही देखील तिच्या डान्स कौशल्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे सध्या तिला या शोमध्ये पाहताना चाहत्यांना आनंद होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 12:19 pm

Web Title: netizens slam terence lewis for brushing nora fatehi butt avb 95
Next Stories
1 अभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव
2 “ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग”; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया
3 ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ
Just Now!
X