सिद्धूसोबत काम करणं बंद कर नाहीतर तुझा शो पाहणं बंद करू अशा इशारा संतापलेल्या नेटकऱ्यांनी कॉमेडिअन कपिल शर्माला दिला आहे.

‘दशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढवा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माझी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे कपिलनं पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही तुझा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे.