18 January 2021

News Flash

जगन शक्तींच्या मानधनात वाढ; अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी घेतली इतकी फी

जगन शक्ती घेणार कोटयवधींच्या घरात फी

अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट साऱ्यांनाच ठाऊक असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून जगन शक्ती यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर जगन शक्ती आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मोठं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

‘बॉलिवूड हंगामा’नुसार, अक्षय कुमार आणि जगन शक्ती मिशन मंगलनंतर मिशन लायन या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी जगन शक्ती तब्बल ४ कोटी रुपये मानधन घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जगन शक्तीप्रमाणेच अक्षयनेदेखील या चित्रपटासाठी तगडं मानधन घेतलं आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू आणि जॅकी भगनानी करणार आहेत.

वाचा : प्रियांकाने मोडले लॉकडाउनचे नियम? स्पष्टीकरण देत म्हणाली…

दरम्यान, मिशन लायनचं चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून येत्या काही दिवसात या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे. तसंच अक्षय कुमार या चित्रपटाचा सहनिर्माता असल्याचं म्हटलं जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 9:21 am

Web Title: new film by akshay kumar and jagan shakti ssj 93
Next Stories
1 प्रियांकाने मोडले लॉकडाउनचे नियम? स्पष्टीकरण देत म्हणाली…
2 अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ मध्ये होणार अंकुश चौधरीची एण्ट्री
Just Now!
X