अभिनेता जितेंद्र जोशी आता आगामी ‘बाजी’ चित्रपटात नव्या ‘लुक’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदीप्रमाणेच नव्या नव्या ‘लुक’मध्ये दिसण्याचा प्रयत्न मराठीमध्ये अलीकडे केला जात आहे.‘बाजी’ या पहिल्या सुपरहीरो अ‍ॅक्शन मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी जितेंद्र जोशीने पूर्ण टक्कल केले असून भूमिकेबरहुकूम शरीरयष्टी दिसण्यासाठी व्यायाम करण्याची मेहनतही केली आहे. या चित्रपटाची पहिली झलक लवकरच सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहे. दार मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘बाजी’ हा चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित होत असून प्रमुख भूमिका श्रेयस तळपदे साकरणार आहे.