31 October 2020

News Flash

चिन्मय उदगीरकर-प्रितम कागणेचा रोमॅण्टीक अंदाज

चिन्मय आणि प्रितम पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत

‘घाडगे & सून’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. मालिका, चित्रपट असा प्रवास करणाऱ्या चिन्मयचा अलिकडे ‘मेकअप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रिंकू राजगुरुने स्क्रीन शेअर केली आहे. त्यानंतर चिन्मय आता लवकरच ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबच अभिनेत्री प्रितम कागणेदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून त्यांचा रोमॅण्टीक अंदाज पाहायला मिळणार आहे.

‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटाच्या माध्यमातून चिन्मय आणि प्रितम पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटामध्ये विनोदी अंगाने एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चिन्मय संजू ही भूमिका साकारत असून प्रितम, दिव्या ही व्यक्तीरेखा वठवत आहे.

संजू आणि दिव्या या दोघांच्याही जगण्याचा वाटा वेगळ्या आहेत. परंतु जेव्हा हे दोघं एकमेकांना भेटतात त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ उमगतो. परंतु प्रेमाचा अर्थ उमगल्यानंतर त्यांच्या नात्यात नेमकं काय घडतं हे चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल.

या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील करत आहेत. तर निर्मिती अमोल लक्ष्मण कागणे, एकनाथराव कागणे करत आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्च २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 4:59 pm

Web Title: new marahi movie vaajuya band baaja chinmay dugirkar and pritam kagane ssj 93
Next Stories
1 लोकनाट्य गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन
2 शिल्पा शेट्टीने ५० दिवसांत कमावले १ कोटी; वाचा कसं?
3 कोणाची रात्र सजवून अभिनेत्री झाले नाही – तनुश्री दत्ता
Just Now!
X