04 March 2021

News Flash

रुपेरी पडद्यावर बहरणार ‘Color फूल’ चित्रपट

'Color फूल' मधून उलगडणार प्रेमाची नवी परिभाषा

४-५ महिन्यांच्या मोठ्या लॉकडाउन नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता चित्रपटसृष्टीदेखील बहरु लागली आहे. अनेक चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तर काही चित्रपट, वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीलादेखील आले आहेत. यामध्येच आता एक ‘Color फूल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘Color फूल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव अनेकांची उत्सुकता वाढवत असून हा चित्रपट नावाप्रमाणेच प्रेमाचे बहरलेले रंग उधळण्यासाठी येत असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

या पोस्टरमध्ये एक कपल रोमॅण्टिक अंदाजात बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटातून एक लव्हस्टोरी उलगडली जाणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. परंतु, या चित्रपटा मुख्य भूमिका नेमकी कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ तसेच ‘सायकल’ असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रकाश कुंटे यांनी कलाविश्वाला दिले आहेत. त्यामुळे आता ‘Color फूल’ नवीन काय रंग घेऊन येणार आहे हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे हे नक्की.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 4:16 pm

Web Title: new marathi movie colorful coming soon ssj 93
Next Stories
1 Video : …अन् ‘पहला नशा’ची आठवण झाली; मुलाचं गाणं ऐकून जतिन पंडित थक्क!
2 देसी गर्लच्या शिरपेचात ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट अन् आईने दिली होती ‘ही’ पहिली प्रतिक्रिया
3 कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात
Just Now!
X