News Flash

…म्हणून प्रीतम पाटील यांच्या ‘ढिशक्यांव’ची होते सोशल मीडियावर चर्चा

जाणून घ्या, या चित्रपटाविषयी

लॉकडाउननंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. असंख्य चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. याच रांगेत आता दिग्दर्शक प्रीतम पाटील यांचा आगामी चित्रपट असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
प्रीतम पाटील यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘ढिशक्यांव’ असं असून या आगळ्यावेगळ्या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्यातच या चित्रपटाचं लक्ष वेधणारं पोस्टरही प्रदर्शित झालं आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एक तरुणी पाठमोरी उभी असून तिच्या बाजूला एका हातात बंदूक धरलेली व्यक्ती उभी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हातात बंदूक असलेला ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती मोहम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. तर प्रीतम पाटील यांचा हा चौथा चित्रपट असून यापूर्वी त्यांनी खिचिक, डॉक्टर डॉक्टर, जिऊ या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 2:59 pm

Web Title: new marathi movie dhishakyanv coming soon ssj 93
Next Stories
1 ‘मुंबई सागा’ सिनेमाचा टीझर रिलीज, जॉन अब्राहम आणि इम्रानचा अ‍ॅक्शन धमाका
2 “त्या दोघांमुळे मी आव्हान स्वीकारु शकलो”; अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर सोहम व्यक्त
3 नवाजने सुपस्टार विजय सोबत काम करण्यास दिला नकार?
Just Now!
X