03 March 2021

News Flash

प्रथमेश अन् पार्थची धम्माल जोडी; ‘डॉक्टर डॉक्टर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या, या चित्रपटाविषयी

टाइमपास आणि बॉइज या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव ही जोडी लवकरच डॉक्टर डॉक्टर या चित्रटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

प्रितम पाटील दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रितम पाटील यांनी या चित्रपटातून पहिल्यांदाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची निर्मिती सागर पाठक, सूरज दगडे-पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. तसंच अमोल कागणे यांनीदेखील सहयोगी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे.

दरम्यान, या चित्रपटात अमोल कागणे झळकणार असून त्यांच्याव्यतिरिक्त अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 6:29 pm

Web Title: new marathi movie doctor doctor movie coming soon ssj 93
Next Stories
1 ‘सूरज पर मंगल भारी’ : सुप्रिया पिळगावकर दिसणार मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजसोबत
2 “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा
3 Video : ‘नेहू दा व्याह’ प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा, नेहा-रोहनची रोमॅण्ट्रिक केमिस्ट्री
Just Now!
X