टाइमपास आणि बॉइज या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव ही जोडी लवकरच ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रटात झळकणार आहे. त्यामुळे या दोघांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. अलिकडेच या चिपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील नवीन गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

प्रेमात पडल्यावर अनेक तरुण त्यांना आवडलेल्या मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. मग यासाठी ते कधी मित्रांची मदत घेतात तर कधी विविध फंडे वापरतात. असंच काहीसं ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटात पार्थ आणि प्रथमेशच्या बाबतीत झाल्याचं दिसून येत आहे. एका मुलीच्या प्रेमात पडलेली ही मुलं तिला इंप्रेस करण्यासाठी विविध फंडे वापरत असल्याचं ‘बँड बाजा’ या गाण्यातून दिसून येत आहे.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर


प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून पहिल्यांदाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची निर्मिती सागर पाठक, सूरज दगडे-पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. तसंच अमोल कागणे यांनीदेखील सहयोगी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे.

दरम्यान, येत्या ३० ऑक्टोबरला ‘डॉक्टर डॉक्टर’ हा चित्रपट ‘झी प्लेक्स’ वर फक्त ९९ रुपयात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अमोल कागणे झळकणार असून त्यांच्याव्यतिरिक्त अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.