सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषय हाताळले जात आहेत. त्यातच समाजप्रबोधन होईल अशा चित्रपटांची निर्मिती सर्वाधिक होत असल्याचं दिसून येत आहेत. यामध्ये आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली असून या चित्रपटातून पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यात येणार आहे.

‘एक होतं पाणी’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामधून दुष्काळग्रस्त गावाची कथा मांडण्यात येणार आहे. पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत आहे.त्यामुळे हा प्रश्न वाढण्यापूर्वीच पाणी वाचविण्यासाठी तरतूद करण्याची गरज आहे हाच संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे.

‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मिती होणाऱ्या या चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतेच पार पडलं असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

दरम्यान, या गाण्याला रोहित राऊत, हृषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांचा सुरेल आवाज लाभला आहे. या चित्रपटाची निर्मिती विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ यांनी केली असून चित्रपटाची कथा आशिष निनगुरकर यांनी लिहीली आहे.