27 January 2021

News Flash

अपूर्वा देणार ‘फ्रि हिट दणका’

जाणून घ्या, अपूर्वाच्या आगामी चित्रपटाविषयी

प्रेम आणि मैत्री यांच्यात एक पुसटशी रेषा असते, असं कायम म्हटलं जातं. हीच रेषा किंवा हे नातं नेमकं काय असतं हे सांगणारा ‘फ्रि हिट दणका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील एका मुख्य भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘फ्रि हिट दणका’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता तानाजी व अरबाज यांच्या भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा एस. साकारणार आहे.

दरम्यान, ‘यंटम’ या चित्रपटातून अपूर्वाने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यास ती सज्ज झाली आहे. सुनील मगरे दिग्दर्शित ‘फ्रि हिट दणका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मैत्री आणि प्रेम यांच्यातील एक सुंदर नातं उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एस.जी.एम निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 4:09 pm

Web Title: new marathi movie free hit danka marathi actress apurva s ssj 93
Next Stories
1 ‘आदित्य १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता’; उदित नारायण यांचा खुलासा
2 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीने केले कोर्टात लग्न
3 राहुल बिग बॉसच्या घरातून का बाहेर पडला?- गौहर खान
Just Now!
X