News Flash

मिताली-सुयशच्या प्रेमाला बहर; काय आहे त्यांचं ‘हॅशटॅग प्रेम’?

सुयश-मिताली पहिल्यांदाच एकत्र

मराठी कलाविश्वात आजवर प्रेमावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यात अनेक चित्रपट तुफान गाजले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळेच यातील काही कलाकारांच्या जोड्याही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. याच प्रेमावर आधारित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. हॅशटॅग प्रेम हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’ हे नाव सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असून या नावावरुन हा चित्रपट ऑनलाइन जगात हरवणाऱ्या तरुणांच्या प्रेमावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री मिताली मयेकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

आणखी वाचा- पोपटलालने केलं लग्न? नववधूच्या स्वागतासाठी गोकुळधामवासी सज्ज

माऊली फिल्म प्रोडक्शनअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती अनिल गोविंद पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शन राजेश जाधव यांनी केलं आहे. सध्या तरी या चित्रपटातील मिताली आणि सुयशच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. मात्र, अन्य कलाकारांची नाव गुलदस्त्यात आहेत. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील निश्चित करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 3:23 pm

Web Title: new marathi movie hashtag prem coming soon actor suyash tilak and mitali mayekar ssj 93
Next Stories
1 वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शवणारा ‘कानभट’
2 नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार
3 नुसरत जहाँ आणि यश यांचा मंदिरातील व्हिडीओ व्हायरल, अफेअरच्या चर्चांना उधाण
Just Now!
X