05 March 2021

News Flash

अनिकेत-प्रियदर्शन पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज

अनिकेत-प्रियदर्शन ही नवीन जोडगोळी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली आहे.

अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटातील ‘तू हात नको लाऊ’ हे प्रदर्शित करण्यात आले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

हिंदी व मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या हिट ठरल्या आहेत. तशीच अनिकेत-प्रियदर्शन ही नवीन जोडगोळी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून या जोडीची धम्माल-मस्ती अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे.  हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा : 

अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या चित्रपटात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच चित्रपटाचे निर्माते दिपक रुईया, प्रदीप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत. त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 6:45 pm

Web Title: new marathi movie majhya baikocha navra aniket vishwas rao and priyadarshan jadhav
Next Stories
1 …म्हणून प्रियांका पडली १० वर्षं लहान निकच्या प्रेमात
2 मेघानं ‘बिग बॉस’च्या खेळात डॉक्टरेट पदवी मिळवल्याचं दिसतंय – अनुप जलोटा
3 ‘या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे’, कुमार विश्वासकडून यशवंत देव यांना मराठीत श्रद्धांजली
Just Now!
X