01 March 2021

News Flash

ठरलं ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार मी शिवाजी पार्क

महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबरच काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी विविध धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक सामाजिक मुद्द्यावर भाष्य करताना दिसतात. या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये महेश मांजरेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबरच काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या१८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘न्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो’ ही टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर यात साकारला आहे.

विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 4:13 pm

Web Title: new marathi movie me shivaji park soon meet audience
Next Stories
1 Video : ‘एक सांगायचंय… Unsaid Harmony’ चा ट्रेलर प्रदर्शित
2 ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची ‘ग्रेटभेट’
3 ‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’
Just Now!
X