News Flash

पुरुषोत्तम करंडक विजेते पहिल्यांदाच ‘मुळशी पॅटर्न’च्यानिमित्ताने एकत्र

या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे.

मुळशी पॅटर्न

महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळवलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाचा पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती पहिल्यांदाच ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे बहुचर्चित ठरत असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रचंड मेहनत घेतली असून त्यांनी योग्य व्यक्तींची निवड केल्याचं दिसून येत आहे.

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे ‘अनंत नारायण’ आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे ‘नटश्रेष्ठ गणपतराव बोडस’ पारितोषिक मिळालेले आहे. तर अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी,अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे ‘नटश्रेष्ठ गणपतराव बोडस’ पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते,देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना ‘निर्मल पारितोषिक’, स्नेहल तरडे यांना ‘माई भिडे’ आणि अक्षय टंकसाळे यांना ‘काकाजी जोगळेकर’ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे या मान्यवरांनी चित्रपटासाठी आपला हातभार लावला असून हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:08 pm

Web Title: new marathi movie mulshi pattern all team purushottam karandak award winners
Next Stories
1 निक-प्रियांका डिझायनर मनीष मल्होत्राला पसंती देणार?
2 अभिनेता एजाज खानला अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
3 ‘#MeToo मोहिमेने पितृसत्ता संस्कृतीला धक्का दिला, पुढील लढाई आणखी कठीण’
Just Now!
X