07 July 2020

News Flash

२१ डिसेंबरला ‘पाटील’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एक प्रेरणादायी संघर्षकथा उलगडली आहे.

असं म्हणतात की, माणूस जन्माला येण्या आधीपासून त्याचा संघर्ष सुरु झालेला असतो. संघर्ष हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. या संघर्षात जो जिद्द दाखवतो, धीराने उभा राहतो आणि स्वतःला घडवतो तोच नवा इतिहास घडवू शकतो. ‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे.

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित ‘पाटील संघर्ष… प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील याचा संघर्षमय प्रवास मांडला आहे.

प्रेम आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला की माणूस सुखी होतो. कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टींची सांगड घालत शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, संघर्ष, त्यांनी पचवलेले दुःख, अपमान आणि त्यानंतर ही परिस्थितीसमोर हार न मानता तिला धीराने उत्तर देण्याची त्याची जिद्द समोर येणार आहे. प्रेम, कर्तव्य यांच्यात समतोल साधू पाहणाऱ्या शिवाजीने हाती घेतलेलं ध्येय तो पूर्णत्वास नेईल का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा.

संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, पाटील चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, , यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदिश पाटील (कोकण आयुक्त) आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेल व्हीजन चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2018 6:25 pm

Web Title: new marathi movie patil will meet again
Next Stories
1 थोड्याच वेळात ख्रिश्चन पद्धतीनं प्रियांका-निक अडकणार लग्नाच्या बेडीत
2 ….तर मी ‘मणिकर्णिका’चं प्रमोशन करणारच नाही
3 ‘अकस’ पुरस्काराने होणार सामान्यांतील कर्तृत्त्वाचा गौरव
Just Now!
X