04 March 2021

News Flash

‘रेडीमिक्स’मध्ये रंगणार वैभव,प्रार्थना, नेहाची गट्टी

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे.

फेब्रुवारी म्हणजे प्रेमवीरांसाठीचा खास महिना. या महिन्यामध्येच व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे तरुणाईमध्ये एक वेगळाच सळसळता उत्साह पाहायला मिळतो.त्यामुळे या महिन्याची खासियत जाणून अभिनेता वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या प्रेमावर आधारित आगामी ‘रेडीमिक्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.

काही जण सतत विचार करत असतात. मात्र हे विचार कुठे थांबवायचे आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे काही जण आधी कृती करतात आणि त्यानंतर विचार करतात. तर काही जण फक्त विचार करतात, मात्र कृती कधीच करत नाहीत, अशा भन्नाट विचार करणाऱ्या ती व्यक्तींची रेडीमिक्समध्ये जोडी जमली आहे. या चित्रपटामध्ये वैभव आणि प्रार्थनासोबत अभिनेत्री नेहा जोशीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

प्रशांत घैसास निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केलं असून अमेय विनोद खोपकर त्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 7:11 pm

Web Title: new marathi movie readymix vaibhav tatwawadiprarthana behere and neha joshi
Next Stories
1 Video : ‘मणिकर्णिका’मध्ये असा होता सोनू सूदचा लूक,व्हिडिओ व्हायरल
2 ….आणि सात वर्षांनंतर जुही-आमिरमधला वाद मिटला
3 Video : ‘सावट’ चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित
Just Now!
X