बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून बायोपिकचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. हाच ड्रेंट आता मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या बायोपिक चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘सत्यशोधक’ या बायोपिकमधून महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा उलगडा होणार आहे.

या चित्रपटासाठी अभिनेता संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका वठविणार आहे. तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

अलीकडेच राजश्री देशपांडेची प्रमुख भूमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ आणि संदीप कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेली ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिज गाजल्या आहेत. या दोघांच्याही अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही कलाकार एकत्र आले आहेत.निलेश जळमकर दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटनं केली आहे.

“महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसंच त्यांचं नातंही काळाच्या पुढचं होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं यावर हा चित्रपट आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचं ५० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाअखेरीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, असं संदीप देशपांडेने सांगितलं.