25 April 2019

News Flash

Video : गजेंद्र अहिरेंचा ‘सोहळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

सोहळा

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यांमधील होणाऱ्या बदलावर भाष्य करण्यात येणार आहे. आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटाची कथा थोडीशी निराळी असल्याचं सांगण्यात येत आहे.

या आगामी चित्रपटाचं नाव ‘सोहळा’ असून या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सचिन पिळगावकर आणि गजेंद्र अहिरे पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

अरिहंत प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडे यांनी केली आहे. तर के.सी बोकाडिया यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसंच यात ‘पांस्थथ मी’, ‘तुझ्या माझ्या आभाळाला’, ‘नो प्रॉब्लेम’ या गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांचा सुमधूर आवाज या गाण्यांना लाभला आहे. हा चित्रपट येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आहे.

First Published on December 6, 2018 6:02 pm

Web Title: new marathi movie sohala coming soon