मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणाल कुलकर्णीने अभिनयाप्रमाणेच दिग्दर्शन, लेखन या क्षेत्रामध्येही नशीब आजमावलं त्यामुळे तिचा स्वतंत्र असा एक चाहतावर्ग निर्माण झाला आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. आज इतके वर्ष कलाविश्वामध्ये स्वत:च स्थान निर्माण केलेली मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. मृणाल लवकरच ‘वेलकम होम’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

चित्रपटाचं कथानक घर, कुटुंब या संकल्पनेवर आधारलेलं आहे. त्यातही स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यात आला आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘वेलकम होम’ हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तर चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे.

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकार या लेखक-दिग्दर्शक जोडीचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. या दोघांनीही आतापर्यंत आशयसंपन्न, विचारप्रवर्तक विषय चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांचा अनेक सोहळ्यांमध्ये सन्मानही करण्यात आला. अशाच नवा धाटणीचा ‘वेलकम होम’ हा चित्रपट घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

दरम्यान, या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे.