झी टॉकीज चित्रपट वाहिनीवर आता मराठीतील अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मराठीतील ‘खो खो’, ‘प्रेमाचा झोलझाल’ आणि ‘वंशवेल’ या नवीन चित्रपटांची भन्नाट मेजवानी प्रेक्षकांना झी टॉकीजच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पहिल्यांदाच झी टॉकीज वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. यापैकी खो खो सिनेमाचा आस्वाद आपण ९ मार्चला घेतला. त्याप्रमाणे येत्या १६ मार्चला  प्रेमाचा झोलझाल तर , २३ मार्चला वंशवेल चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. असे दोन वेळा प्रक्षेपित होणार आहेत.