प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. फक्त तो सर्वांसमोर येण्यासाठी त्याला एका संधीची गरज असते. ही संधी बऱ्याच रिअॅलिटी शोमधून कलाकारांना मिळाली आहे. ‘सारेगमप’, ‘सूर नवा ध्यास नवा’ अशा शोमधून महाराष्ट्राला अनेक गुणी गायक, गायिका मिळाले. त्यातच आता आणखी एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवर लवकरच ‘मी होणार सुपरस्टार’ हा सिंगिंग रिअॅलिटी शो सुरु होत आहे. पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

या शोमध्ये आदर्श शिंदे,राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हे परीक्षक पदाची भूमिका पार पाडणार आहेत. तर या शोच्या निमित्ताने मराठी कलाविश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ हे स्पर्धकांना परीक्षकांसमोर नॉमिनेट करणार आहेत.१२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Writer Vishwas Patil Post for Vishal Patil
‘बोफोर्सच्या वादळात राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार’, विश्वास पाटील यांची पोस्ट चर्चेत
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
nitin gadkari on emergency
“… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली आठवण; आणीबाणीचा केला उल्लेख!

‘मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे. मराठी बोलताना आपलेपणा जाणवतो. शाळेत असताना माझा मराठी हा आवडता विषय होता आणि इतर विषयांपेक्षा सर्वात जास्त मार्क्स मला मराठीमध्ये मिळायचे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या शोच्या पहिल्या एपिसोड साठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. या मंचावर मी मराठी गाणीही गायली आहेत. खास बात म्हणजे शोची संकल्पना मला खूपच भावली. आयुष्यात सेकंड चान्स खूप कमी जणांना मिळतो. त्यामुळे या कार्यक्रमातून देण्यात आलेल्या संधीचा स्पर्धकांनी पुरेपूर फायदा करुन घ्यायला हवा, असं गायक शान म्हणाला.

दिग्गजांचे जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेंट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळून आलाय. त्यामुळे १२ जानेवारीचा रविवार प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे.