19 September 2020

News Flash

चित्रचाहूल : नव्या मालिकोंचे पर्व..

काही मालिका वर्षांअखेरच दाखल झाल्या आहेत तर काही जानेवारी महिन्यात येऊ  घातल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

निलेश अडसूळ

मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग आजही मोठय़ा प्रमाणात आहे आणि तो तितकाच चोखंदळ आहे. त्यामुळे  काय पाहावं आणि काय पाहू नये याची निवड करण्यात तो सहसा चुक त नाही. आता तर वाढत्या वाहिन्या आणि इतर माध्यमांमुळे त्याची आशयाची भूक  अधिकच रुंदावत चालली आहे. असे असतानाच नवीन वर्षांचे औचित्य साधून प्रत्येक  वाहिनीने काही नव्या मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. काही मालिका वर्षांअखेरच दाखल झाल्या आहेत तर काही जानेवारी महिन्यात येऊ  घातल्या आहेत.

गृहिणी म्हणून राबणारी आई कायमच आपल्या स्वप्नांना तिलांजली देत असते. परंतु तिच्या त्यागाची घरात प्रत्येकालाच किंमत असते असे नाही. आणि याच आईच्या भावविश्वावर आधारलेली ‘आई कु ठे काय करते’ ही मालिका नुक तीच स्टार प्रवाहवर आली आहे. मालिका येऊ न जरी काही दिवस झाले असले तरी घराघरातल्या आईचं  प्रतिनिधित्व क रणारी अरुंधती प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली आहे. संसारासाठी स्वत:ला झोकू न देणाऱ्या तिची स्वप्नं मात्र मागे पडत आहेत. या मालिके च्या निमित्ताने मधुराणी प्रभुलक र यांनी १० वर्षांनी मालिका विश्वात पदार्पण के ले आहे. तर याच वाहिनीवर १२ जानेवारीपासून ‘मी होणार सुपरस्टार’ हा नवा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम येत आहे. आपलं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना हा मंच सुवर्णसंधी ठरणार आहे. आदर्श शिंदे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमाचे परीक्षक  असून पुष्कर श्रोत्री निवेदकाच्या भूमिकेत असणार आहे.

तर सोनी मराठी वाहिनीवर सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांचा चरित्रपट दाखवण्यात येणार आहे. ६ जानेवारीला ‘सावित्रीजोती’ मालिका येत असून मालिकेत केवळ फुले दाम्पत्याच्या आयुष्यातील म्हत्त्वाच्याच घटनाच नाही तर बालपण आणि जडणघडणही  दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे न पाहिलेले, न ऐक लेले सावित्रीजोती या मालिके तून पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री अश्विनी कासार सावित्रीबाईंची भूमिका साकारणार असून ओंकार गोवर्धन जोतिरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’, ‘अल्टी पलटी’ या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून जानेवारी महिन्यात ‘महाराष्ट्राच्या सुपरस्टार’ आणि ‘अळीमिळी- गुपचिळी’ हे दोन नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निलेश साबळे, तेजपाल वाघ, संक र्षण क ऱ्हाडे, धनश्री कडगावकर, अभिजीत खांडकेकर, योगिनी चौक अशा अनेक  नव्या हरहुन्नरी कलाकारांना जगासमोर आणणारा ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा कार्यक्रम १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रभरातील ऑडिशन फेऱ्या नुक त्याच संपल्या असून लवक रच हे नवे कलाकार आपली क ला सादर क रण्यासाठी सज्ज होणार आहेत. तर अनेकदा लहान मुलांच्या खरेपणामुळे आई-बाबा अडचणीत येत असतात. कलाकारांच्या बाबतीतही असे अनेक किस्से घडतात त्याच किश्शांना व्यासपीठ देणारा ‘अळीमिळी-गुपचिळी’ हा कार्यक्रमही जानेवारी महिन्यात झी मराठीवर येणार आहे. ज्यामध्ये क लाकार आणि त्यांच्या मुलांमधील मिश्कील संवाद प्रेक्षकांना अनुभवता येईल.

तर कलर्स मराठी वाहिनीवर १८ डिसेंबरला ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेतून ‘संजिवनी आणि रणजीत’ या पात्रांची प्रेमक था प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सांगलीमधील एका सामान्य कुटुंबातील संजीवनी आणि राज घराण्यातील रणजीत यांच्यात खुलणारे प्रेम काहीसे वेगळे आहे. इतरांच्या भल्यासाठी खोटं बोलणारी संजीवनी तर तत्त्व आणि खोटय़ाची चीड असलेला रणजीत यांच्यात बंध जुळतील का आणि ते जुळले तरी टिकतील का हे मात्र आगामी भागात पाहायला मिळणार आहे. सध्या संजीवनीच्या बहिणीची आणि रणजीतच्या लग्नाची बोलणी सुरू झाल्याने मालिकेला नवे वळण मिळाले आहे. आता हे लग्न मोडणार की अजून काही गंमत प्रेक्षकांना अनुभवता येणार हे कळलेच. या मालिकेत शिवानी सोनार संजीवनीच्या भूमिकेत तर मनीराज पवार रणजीतच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले आणि अजय पुरकर यांच्याही अभिनयाची फोडणी मालिकेला मिळाल्याने मालिका अधिकच खुमासदार झाली आहे.

रटाळ मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना या मालिकांनी आनंद मिळेल अशी अशा आहे. डिसेंबर अखेर काही मालिकांनी आपली हजेरी लावल्याने आता तरी त्या प्रेक्षकांच्या आशेस पात्र ठरल्या आहेत. तर जानेवारीत येणाऱ्या मालिकाही काही तरी नवा आणि मजेशीर आशय रसिकांना देतील अशी अपेक्षा क रायला काहीच हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 4:42 am

Web Title: new marathi serial in new year abn 97
Next Stories
1 शरद पोंक्षे यांना ‘माझा पुरस्कार’
2 रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
3 करीनाला करायचाय तिच्यापेक्षा लहान तरुणासोबत रोमान्स
Just Now!
X