24 November 2020

News Flash

नवी मालिका ‘लाडाची मी लेक गं’!

मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप यांच्या भूमिका

लग्नाआधी आई वडिलांची लाडाची लेक लग्न झाल्यावर सासरची सून होते पण लाडाची लेक राहत नाही असं म्हटलं जातं. माहेरचे दरवाजे आजकाल लग्नानंतरही उघडे असतात पण मुलगी मात्र परक्याचं धन म्हणून संबोधली जाते. बापाची लाडाची लेक आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप लग्नानंतरही सावली सारखा आणि देवासारखा उभा राहिला तर.. अशीच एक गोष्ट झी मराठी वाहिनीवरच्या नव्या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेत प्रेक्षकांना कस्तुरीचा प्रेमसंघर्ष अनुभवता येईल. या मालिकेत प्रेमात संघर्ष नाही तर प्रेम आणि संघर्ष दोन्ही आहेत. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप असे तगडे कलाकार असणार आहेत. कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

१४ सप्टेंबर पासून ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 5:46 pm

Web Title: new marathi serial on zee marathi ladachi mi lek ga ssv 92
Next Stories
1 ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’; सुशांतच्या चाहत्यांचे Notable आंदोलन
2 अभिनेत्री- गायिका प्रियांका बर्वेला पुत्ररत्न; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
3 घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…
Just Now!
X