News Flash

दत्तगुरुंचा महिमा सांगणारी पौराणिक मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’

दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मराठी असो वा हिंदी सध्या प्रत्येक वाहिनीवर पौराणिक मालिकांचा ट्रेण्ड पाहायला मिळतोय. ‘विठुमाऊली’ मालिकेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादानंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. दत्तगुरुंचा महिमा सांगणाऱ्या या मालिकेचं नाव ‘श्री गुरुदेव दत्त’ असं असेल. १७ जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसंच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असं पुराणांमध्ये दत्तगुरुंचं वर्णन केलं जातं. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरु. दत्तगुरुंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळले. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दिपक देऊळकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिग्दर्शक अनिल राऊत आणि स्वत: दिपक देऊळकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असेल. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 3:18 pm

Web Title: new marathi serial sri gurudev dutt coming soon on star pravah
Next Stories
1 ‘जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड ‘
2 #Super30Trailer : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा’,सामान्य गणितज्ञाची असामान्य कथा
3 लग्न म्हणजे मरणसंस्था- सलमान खान
Just Now!
X