५ नोव्हेंबर २०१८, हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचं औचित्य साधत ZEE5 ने आपली नवीन मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ची घोषणा केली आहे. कॉलेज लाईफमधील एकांकिका स्पर्धा, पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील नाट्य, यांच्याबरोबरीनेच सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ असे या मालिकेचे साधारण कथानक असेल.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता तरुण चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाकेने या सीरिजचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन केले आहे. सुजय डहाके आपल्या दृश्यात्मक कथांसाठी प्रसिध्द आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याने आजपर्यंत हाताळले असून त्यांच्या चित्रपटांमध्ये शाळा, आजोबा आणि फुंतरू यांचा समावेश आहे. ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’च्या माध्यमातून सुजय आता डिजीटल वेब सिरीजच्या माध्यमात प्रवेश करणार आहे. ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ ६ कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारीत असून त्यांना प्रसिध्द अशा नाट्य स्पर्धेत भाग घ्यावा लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय नाट्य घडते हे या मालिकेत पाहायला मिळेल. १० भागांची ही मालिका असून यामध्ये नवीन तरुण कलाकारांचा समावेश असेल.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

वाचा : दिवाळीच्या निमित्ताने ‘घाडगे & सून’, ‘हे मन बावरे’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

दिग्दर्शक सुजय डहाके सांगतो, ‘ZEE5 बरोबर सेक्स, ड्रग्ज & थिएटर या माझ्या पहिल्या वेब सिरीजची निर्मिती करताना मला अतिशय आनंद होतोय. आजच्या जमान्यातली, आजच्या तरुणाईची ही कथा आहे. एकांकिका आणि नाटक हे मराठी लोकांचे विशेषतः मराठी तरुणांचे आवडते विषय. मात्र या शोमध्ये या विषयाला अतिशय वेगळ्या पध्दतीने दर्शवण्यात आले आहे. आजचा मराठी तरुण जागृत, संवेदनशील, जोशपूर्ण तर आहेच पण याबरोबरीनेच आपल्या मुळाशी इमान राखून आहे. या शोच्या माध्यमातून मराठी तरुणाईला, त्यांच्या कॉलेज जीवनाला एका अनोख्या हटके पध्दतीने दाखविण्यात येईल. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही वेब सीरीज सर्व वयोगटातील प्रेक्षकांना निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे. लवकरच या वेब सीरिजबद्दलची अधिक माहिती तसेच यामध्ये काम करणार्‍या कलाकारांची घोषणा करण्यात येईल.’