लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला ओढ असते ती आपल्या माहेरची. आपल्या माहेरच्या माणसांना भेटावं, त्यांच्यासोबत तासनतास गप्पा मारात बसाव्यात असं प्रत्येक सासुरवाशीनीला वाटत असतं. लग्नानंतर स्त्रियांच्या मनाची होणारी ही घालमेल अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मात्र, अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेतून एक हटके माहेरवाशीन पाहायला मिळणार आहे. जिला माहेर नकोसं झालं असून, सासरं हवंहवंस वाटू लागलं आहे.

सोनी मराठीवर लवकरच अस्सं माहेर नको गं बाई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून एका कुटुंबात घडणाऱ्या धमाल गोष्टी पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबात लेकीपेक्षा जावयाचेच जास्त लाड होताना दिसतात.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षांवर पाणी पडतं. सखीच्या घरातले मुलीपेक्षा जावयाचेच लाड करताना दिसतात. त्यामुळे सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. अलिकडेच अशा आशयाचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दरम्यान, या मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. यापूर्वी पुष्कराज आणि स्वानंदी या दोघांनी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांची अस्सं माहेर नको गं बाई ही मालिका येत्या ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.