छोट्या पडद्यावर सध्या ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका तुफान गाजत आहे. एकेकाळी श्रीधरच्या प्रेमात पार बुडून गेलेल्या स्वातीसमोर त्याचा खरा चेहरा आला आहे. त्याचा खोटेपणा, विश्वासघातकीपणा तिने पाहिला आहे. त्यामुळे सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. यामध्येच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे.

‘बिग बॉस मराठी’ या शोमधून घराघरात पोहोचलेला आस्ताद काळे चंद्र आहे साक्षीला या मालिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या येण्यामुळे स्वातीच्या आयुष्यात आणि मालिकेत अनेक बदल घडणार आहेत. त्यामुळे आस्ताद नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
History made by Raj Bhagat He became first young man from Vasai to clear competitive examination
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

दरम्यान, अस्ताद या मालिकेत झळकणार असला तरीदेखील त्याच्या भूमिकेवर पडदा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. मात्र, येत्या काही भागांमध्ये आस्तादच्या भूमिकेवरील पडदाही दूर सारण्यात येणार आहे.