सध्याच्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक कथांवर अनेक चित्रपट, मालिकांची निर्मिती होताना दिसत आहे. यात बऱ्याच मालिका पौराणिक कथांवरच आधारित असून त्यांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. याच मालिकांच्या यादीत आता आणखी एका नव्या मालिकेचा समावेश होणार आहे.
‘घेतला वसा टाकू नका’, असं शीर्षक असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून चातुर्मासातील कथा आणि व्रतवैकल्य यांवर भाष्य केलं जाणार आहे. त्यामुळे मालिकेविषयी जाणून घेण्याची महिला वर्गात जास्त उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एक नवा प्रयोग केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. ही नवी मालिका ७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 4:45 pm