मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटांमधून अनेक लेखक,दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु करण्यात आलं आहे.

‘एक होतं पाणी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या माध्यमातून श्रिया मस्तेकर हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झालं असून चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु करण्यात आलं आहे.

सामाजिक विषयाला हात घालणारा ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने ‘पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे’, असा संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाला संगीत दिग्दर्शन विकास जोशी यांचे असून रोहित राऊत,आनंदी जोशी,ऋषिकेश रानडे यांचा आवाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहेत. विजय तिवारी आणि डॉ. प्रविण भुजबळ यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर,रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, वर्षा पाटणकर,राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांची मांदियाळी आहे.