मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून अभिनेता गश्मीर महाजनी ओळखला जातो. आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळविला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. याच कारणामुळे त्याचा प्रत्येक चाहता त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्याच्या याच चाहत्यांसाठी त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गश्मीरच्या पत्नीने गौरीने एका लहान बाळाला जन्म दिला आहे. २१ डिसेंबरला गश्मीरच्या चिमुकल्याचा जन्म झाला. बाळाचं या जगात आगमन झाल्यानंतर गश्मीरने बाळासोबतचा एक फोटो शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

वडील होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. माझ्या चिमुकल्याचं नाव अजून ठेवलं नाही. पण तोपर्यंत त्याला ज्युनिअर गश्मीर म्हणायला हरकत नाही, असं कॅप्शन गश्मीरने शेअर केलेल्या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, गश्मीरने ‘देऊळ बंद’ , ‘कॅरी ऑन मराठा’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘कान्हा’ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच त्याचा ‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे चित्रपट, मालिकांव्यतिरिक्त तो आगामी ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारतो आहे.