News Flash

फोटोः तैमुरच्या जन्मानंतर सैफिनाची पहिली डिनर डेट

एका नवाबाला साजेशा अशाच पेहरावात सैफ दिसला

करिना, सैफची खास डिनर डेट

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर संपूर्ण पतौडी कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. २० डिसेंबरला करिनाने तैमुरच्या जन्माची गोड बातमी संपूर्ण जगाला दिली. नुकतेच सैफ आणि करिना दोघंही मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी आले होते. बाळाच्या व्यग्र कामातून थोडासा वेळ काढत त्यांनी एकमेकांनाही वेळ द्यायचे ठरवले असावे.

पेस्टल रंगाच्या कपड्यात करिना कपूर फारच सुंदर दिसत होती. यावेळी सैफही त्याच्या नेहमीच्या पेहरावात दिसला होता. एका नवाबाला साजेशा अशाच पेहरावात सैफ अनेक ठिकाणी दिसतो. छायाचित्रकारांना फोटो देण्यासाठीही दोघांनीही मनाई केली नाही. त्या उलट छायाचित्रकारांसोबतच त्यांनी आपल्या चाहत्यांसोबतही फोटो काढण्यासाठी वेळ दिला. या संपूर्ण वेळेत सैफ, करिनाची फार काळजी घेताना दिसत होता.

यावेळी त्यांना दिया मिर्झा आणि तिचा नवरा साहिल संघा यांनीही सोबत दिली. नाताळच्या निमित्ताने तसेच तैमुरच्या स्वागताची सैफ आणि करिनाने त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांची सारा आणि इब्राहिम ही दोन्ही मुलेही या पार्टीत उपस्थित होती.

kareena-21

kareena-32

kareena-saif-2

kareena-saif-3

kareena-saif-4

सैफ त्याच्या आगामी ‘शेफ’ या सिनेमासाठी युरोपला जात आहे. सैफसोबत त्याला साथ देण्यासाठी बेगम करिना आणि छोटे नवाब तैनुरसुद्धा तेथे जाणार आहेत. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सैफ युरोपला रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सैफ कोणत्याही परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला एकटे सोडू इच्छित नाहीये. तैमुरच्या जन्मानंतर शक्य तितका वेळ तो कुटुंबासोबतच व्यतीत करण्यास प्राधान्य देत आहे. अशी माहिती सैफिनाच्या निकटवर्तीयांनी दिल्याचे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले होते.

दरम्यान, रिताक्षी अरोराने सैफिनाच्या बाळाच्या खोलीचे डिझाईन केले असल्याचे वृत्त पिंकविला या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. ‘द डायपर ड्रामा’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे छोट्या नवाबाच्या खोलीचा एक फोटोही पोस्ट करण्यात आला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 2:06 pm

Web Title: new mommy kareena kapoor glowing at her dinner date with saif ali khan see pics
Next Stories
1 उत्तराखंडला गेलेल्या विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल
2 ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक निघाले दुबईच्या सफरीला
3 PHOTOS: मुलांसोबत हृतिक-सुझानची दुबई सफर
Just Now!
X