करिना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक हॉट अभिनेत्री आहे यावर कोणाचेच दूमत नसेल. लग्नानंतर ती नवाबाची बेगम झाली आणि त्याचपद्धतीने प्रसारमाध्यमांसमोर वावरु लागली. पण आता तिने पुन्हा एकदा थोडं बोल्ड होण्याचा निर्णय घेतला आहे. वोग मासिकासाठी तिने खास फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट पाहून तुम्ही ही करिनाच का असा प्रश्न स्वतःला नक्कीच विचाराल.
तैमुर आणि तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. आता त्यात या ‘वोग’ मासिकासाठी केलेल्या फोटोंची भर पडली आहे. हे फोटोसेशन खास स्वीमसूटमध्ये करण्यात आलं होतं. आता स्वीमसूटमध्ये फोटो काढायचे म्हणजे त्यासाठी बॉडीही तेवढीच आखीव असणे गरजेचे आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिनाने तिच्या फिटनेसवर फार लक्ष दिलं.
करिनाने एकाच वेळी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटोसेशन केले. काळ्या रंगाच्या स्वीमसूटमध्ये ती फारच मादक दिसत होती यात काही शंका नाही.
करिनाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमातून ती पुनरागमन करणार आहे. सध्या ती सैफ अली खान आणि तैमुरसोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या दरम्यानचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये त्यांचा रॉयल अंदाज दिसून येतो. करिनाने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. तर सैफही काळ्या सूटमध्ये राजबिंड दिसत होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 6:58 pm