21 January 2018

News Flash

आत्याच्या वाढदिवसाला असा तयार झाला तैमुर

तैमुरनंतर आता सोहा आणि कुणालची मुलगीही सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 6, 2017 5:36 AM

करिना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुरला पाहण्यासाठी सध्या सारेच उत्सुक असतात. तैमुरवर सोशल मीडियावर टीका होत असली तरी त्याचे फोटो पाहणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यावरुनच तैमुरची सोशल मीडियावरील क्रेझ लक्षात येते. नुकतेच बाबा सैफसोबत तैमुरचे काही कूल फोटो समोर आले.

आत्या सोहा अली खानच्या वाढदिवसाला आई- बाबांसोबत जाताना तैमुर फार उत्साही दिसला. तसे पाहायला गेले तर तैमुर साऱ्याच कपड्यात गोंडस दिसतो. या नाइट ड्रेसमध्येही तो तेवढाच गोड आणि गोंडस दिसत होता. तैमुससोबत सैफ आणि करिनाही अगदी कॅज्युअल टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसले. या तिघांचे हे आऊटफिट पाहून कदाचित सोहाच्या बर्थडे पार्टीची थीम ‘पजामा पार्टी’ असेल वाटते.

लवकरच तैमुर एक वर्षांचा होईल. आत्याच्या घरी जाताना तैमुरने प्रसारमाध्यमांना फार उत्साहाने फोटो काढू दिले. ४ ऑक्टोबरला सोहाने आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. २९ सप्टेंबरला सोहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या ती आणि कुणाल आपल्या मुलीच्या म्हणजे इनायाच्या संगोपनात व्यग्र आहे. सोहाच्या वाढदिवसा दिवशी कुणालने तिच्यासोबतचा एका फोटो इन्स्टाग्रामवर टाकत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तैमुरनंतर आता सोहा आणि कुणालची मुलगीही सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. पण अजूनपर्यंत इनाया नौमीचा एकही फोटो समोर आलेला नाही.

सध्या ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेली करिनाही सोहा आणि कुणालच्या घरी गेली होती. करीनाने यावेळी प्रिन्टेंड टी-शर्टसोबत काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. सोहाच्या पार्टीनंतर सैफ लगेच त्याच्या ‘शेफ’ सिनेमाच्या प्रिमिअरला गेला होता.

First Published on October 6, 2017 5:35 am

Web Title: new photos of taimur ali khan with papa saif ali khan after soha ali khans birthday bash
  1. V
    Vikrant
    Oct 6, 2017 at 7:05 pm
    कसा जेवला आणि हगला हे पण दाखवा.
    Reply