News Flash

‘द गाझी अटॅक’चे पोस्टर प्रदर्शित

हा सिनेमा भारतात पहिल्यांदा झालेल्या सागरी युद्धावर आधारीत आहे

'द गाझी अटॅक'

सिनेनिर्माता करण जोहरने त्याच्या आगामी द गाझी अटॅक या सिनेमाचा पोस्टर ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. धर्मा प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत बनणारा हा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन देबुकांत संकल्प रेड्डी यांनी केले आहे. या सिनेमात राणा डगुबत्ती, तापसी पन्नु, के. के. मेनन आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

taapsee-pannu

हा सिनेमा भारतात पहिल्यांदा झालेल्या सागरी युद्धावर आधारीत आहे. द गाझी अटॅक हा सिनेमा एक नौदल अधिकारी आणि त्याच्या टीमची कथा सांगणारा आहे. या टीमने कशा प्रकारे १८ दिवस पाण्याखाली घालवले याची चित्तथरारक कथा या सिनेमात सांगण्यात येणार आहे.

 

 

या सिनेमाचे पोस्टर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाचा पहिला ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. राणा डगुबत्ती आणि तापसी पन्नु यांनी याआधी बेबी या सिनेमात एकत्र काम केले आहे. राणा डगुबत्तीच्या बाहुबलीमधील व्यक्तिरेखेची अनेकांनी प्रशंसा केली. तर दुसरीकडे तापसी पन्नुने पिंक या सिनेमात साकारलेली व्यक्तिरेखाही लक्षात राहणारी अशीच होती. तापसी पन्नुने आतापर्यंत अनेक तेलगु सिनेमात काम केले आहे.

 

rana

 

सिनेनिर्माता करण जोहरने एए फिल्म्स यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा भारतातला पहिला सागरी युद्धावर बनवण्यात आलेला सिनेमा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 9:02 pm

Web Title: new poster of movie the gazi attack
Next Stories
1 ‘दंगल’च्या सान्याचा हा एसआरके अवतार पाहिला का?
2 ‘फिल्मफेअर’च्या शर्यतीतून खिलाडी बाद; ‘धाकड’ मुलींकडेही दुर्लक्ष
3 PHOTO: बाबांसारखाच अब्रामही मुलींमध्ये प्रसिद्ध
Just Now!
X