News Flash

हॉकी खेळाडूच्या रुपातील तापसीला पाहिलं का ?

'बेबी', 'पिंक', 'नाम शबाना' यासारख्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तापसी पन्नू या नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

तापसी
२०१७-१८ या वर्षभरामध्ये अनेक नवनवीन चित्रपटांचा धडाका सुरु असतानाच आता आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.  या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘बेबी’, ‘पिंक’, ‘नाम शबाना’ यासारख्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तापसी पन्नू या नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
हॉकीपटू संदीप सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘सूरमा’ या चित्रपटाचे काही पोस्टर अभिनेता दिलजीत दोसांज यांनी प्रदर्शित केल्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी आणखी एक नवा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये तापसी एका खेळाडूच्या रुपात दिसते आहे.
पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर तापसीने देखील ट्विटरवर या चित्रपटाचा उल्लेख करत एक पोस्ट केली. हॉकी या खेळाप्रती माझे प्रेम कधीच कमी होणे शक्य नाही. पराभव ज्या मुलीला माहित नाही अशा हरप्रीतला अर्थात प्रीतला येत्या १३ जुलै रोजी नक्की भेटा’, अशा आशायाचे ट्वीट तापसीने केले आहे.
taapsee तापसी पन्नू

‘सूरमा’ हा चित्रपट हॉकी खेळाडू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या या खेळाडूच्या आयुष्यातून सूरमाच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. तापसी पन्नू आणि दिलजीत दोसांज यांच्याव्यतिरिक्त अभिनेता अंगद बेदीसुद्धा या चित्रपटातून एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. ‘सूरमा’ चित्रपटाची निर्मिती दिपक सिंह करत असून चित्रांगदा सिंह ही सहनिर्माती आहे.


तापसी पन्नूने आतापर्यंत हिंदी, तेलुगू, कन्नड यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्येही तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला असून ‘सूरमा’ या चित्रपटामध्येही ती नव्या अंदाजात पहायला मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 9:00 am

Web Title: new poster release of soorma taapsee pannu look like this
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं…
2 Top 10 News: माधुरी दीक्षितच्या वाढदिवसापासून ते ‘रेस ३’ च्या ट्रेलरपर्यंत
3 ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशीची एण्ट्री!
Just Now!
X