Advertisement

सासूबाईं’नंतर ‘सूनबाई’; लवकरच येतेय नवी मालिका

‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेचा प्रोमो नुकताच झाला प्रदर्शित

झी मराठीवरची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. यातली पात्रं म्हणजे अभिजीत राजे, आसावरी आणि विशेषतः बबड्या प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आहेत. आजही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. कदाचित हाच विचार करून या मालिकेसारखीच आणि यातलेच कलाकार घेऊन एक नवी मालिका लवकरच येत आहे.

नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
याच्या प्रोमोमध्ये दिसतंय की आसावरी म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ एका मिटिंगमध्ये बसलीये आणि अभिजीत राजे अर्थात अभिनेते डॉ. गिरीश ओक त्यांना फोन करून जेवणाबद्दल विचारतायत.

याच प्रोमोत शुभ्राही दिसतेय. पण ही शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान नसून एक नवीन अभिनेत्री आहे आणि तिच्या कडेवर एक छोटं बाळही दिसतंय. 12 मार्चपासून ही नवी मालिका सुरु होत आहे.

आता ह्या नव्या मालिकेची कथा काय असेल, सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे, यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका मीमर्ससाठीही चांगलंच खाद्य ठरते आहे. आता ही ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिका सुरु होण्यापूर्वीच मीम मटेरियल ठरत आहे.

22
READ IN APP
X
X