मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील मराठी नाटके सादर होत असून प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पैकी अनेक नाटकांच्या नावांवर सहज नजर टाकली तरी ‘नाटक मराठी नाव मात्र इंग्रजीत’ असे चित्र पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ हे नाटक आले होते. ‘बॅरिस्टर’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘सेलिब्रेशन’, ‘ऑल दि बेस्ट’ आदी इंग्रजी नावांची मराठी नाटकेही यापूर्वी येऊन गेली. पण काही वर्षांपूर्वी अभावानेच इंग्रजी नावे पाहायला मिळत असत. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या अनेक नाटकांची नावे इंग्रजीतून आहेत. यात ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘लव्ह इन रिलेशनशिप’, ‘व्हाइट लिली अॅण्ड नाईट रायडर’, ‘गेट वेल सून’, ‘वैशाली कॉटेज’, ‘टॉम अॅण्ड जेरी’, ‘यू टर्न’, ‘प्रपोजल’, ‘फायनल ड्राफ्ट’ आदी विविध विषयांवरील नाटकांचा समावेश आहे. यातील काही नाटकांची नावे आकर्षक आणि प्रेक्षकांची उत्सुकता जागविणारी आहेत. बहुतांश नवी पिढी ही इंग्रजी माध्यमातून शिकणारी असल्याने या नव्या पिढीला मराठी रंगभूमीकडे वळविण्यासाठी मराठी नाटकांची अशी ‘कॅची’ नावे देण्याकडे निर्माते आणि दिग्दर्शक यांचा कल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.    

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..