सध्या प्रेक्षकांमध्ये कारभारी…लय भारी या एकाच मालिकेची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर ही मालिका अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. मात्र, त्यापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता ताणल्यानंतर लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विक्रम म्हणजे अभिनेता निखील चव्हाण या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे सध्या तो लोकप्रिय ठरत आहे. अलिकडेच या मालिकेचं शीर्षक गीतदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यामुळे आता ही मालिका कधी प्रसारित होणार हा एकच प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत होता. मात्र, ही मालिका येत्या २ नोव्हेंबरपासून म्हणजेच येत्या सोमवारपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच


किरण दळवी दिग्दर्शित या मालिकेचं लेखन तेजपाल वाघने केलं असून मालिकेतील संवाद विशाल कदमने लिहिले आहेत. तसंच निखील चव्हाणसोबत अभिनेत्री अनुष्का सरकातेही अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.