मराठी कलाविश्व आणि हिंदी सिनेसृष्टी यांच्यात असलेली धुसरशी रेषा आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. तर काही बॉलिवूड स्टार्सनेदेखील मराठीत पदार्पण केलं आहे. यामध्येच आता अनेक मराठी चेहरे मालिका, वेब सीरिजमध्ये झळकू लागले आहे. असेच काही मराठीतील लोकप्रिय कलाकार रुद्रकाल या मालिकेत झळकणार आहेत.

‘रुद्रकाल’ ही रहस्यमय मालिका असून सुकृती त्यागी त्याचं दिग्दर्शन करत असून दशमी क्रिएशन निर्मिती करत आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका प्रकरणात अडकलेल्या बंडखोर पोलिसाची आणि त्याच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत श्रुती मराठी, स्वानंद किरकिरे आणि किशोर कदम हे मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

वाचा :   ‘दिल बेचारा’नंतर संजना सांघीच्या पदरात नवा चित्रपटच; आदित्य रॉय कपूरसोबत शेअर करणार स्क्रीन

समाजात वावरताना दर दिवशी आपल्याला नव्या संकटांना सामोरं जावं लागतं. त्यामुळेच सद्यस्थितीला धरुन या मालिकेमध्ये भाष्य करण्यात आलं आहे, असं निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितलं. दरम्यान, ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भानू उदय, दीपांनीता शर्मा आणि रुद्राक्ष जैस्वाल ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.